Income Tax Return : ITR भरण्याची मुदत वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करता येईल ITR फाईल

Income Tax Return : ITR भरण्याची मुदत वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करता येईल ITR फाईल

आयकर विभागाकडून आयकरदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर निर्धारण वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख वाढविण्यात आली आहे.
Published by :
Rashmi Mane
Published on

आयकर विभागाकडून आयकरदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर निर्धारण वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख वाढविण्यात आली आहे. आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 वरून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) वतीने महत्त्वाची माहिती शेअर करताना, करदात्यांना दिलासा देणारी बातमी देण्यात आली. करदात्यांना दिलासा देण्यासाठी ही सवलत देण्यात आली आहे. आयकर रिटर्न फॉर्म अधिसूचनेत झालेल्या विलंबानंतर हा निर्णय घेण्यात आला.

आयटीआर फॉर्ममध्ये मोठे बदल, सिस्टम अपग्रेड आणि टीडीएस क्रेडिटमधील तफावत यामुळे आयकर रिटर्न भरण्याची तारीख वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. करदात्यांना त्यांचे रिटर्न भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा आणि त्यांना त्यांचे रिटर्न योग्यरित्या आणि सुरळीतपणे भरण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळावा, यासाठी अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फॉर्ममधील बदलासोबतच, आयकर फाइलिंग पोर्टलवर सिस्टम अपग्रेडचे कामदेखील सुरू आहे. या मुदतवाढीनंतर, आता जर तुम्ही 15 सप्टेंबर 2025 पर्यंत तुमचा आयटीआर दाखल केला, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही. याचा फायदा नोकरदार, फ्रीलांसर, व्यावसायिक, छोटे व्यापारी इ. सारख्या करदात्यांना आणि लघु व्यवसायांना होईल, ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे बंधनकारक नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com