Maharashtra Local Body Elections : नगरपरिषद – नगर पंचायत निवडणूक खर्च मर्यादेत वाढ, काय म्हणाले निवडणूक आयुक्त?
थोडक्यात
नगरपरिषद – नगर पंचायत निवडणूक खर्च मर्यादेत वाढ
इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारेच मतदान होणार आहे
काय म्हणाले निवडणूक आयुक्त?
२४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतीचा राज्यातील कार्यक्रम जाहीर झाला आहे. २ डिसेंबरला या निवडणूकांसाठी मतदान होणार असून येत्या ३ डिसेंबरला निकाल होणार आहे. राज्यातील स्थानिय स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतीमध्ये निवडणूका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या निवडणूकांसाठी २ डिसेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते. जानेवारी २०२६ च्या आधी या निवडणूका व्हाव्यात असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. राज्य निवडणूक आयोगाने त्यानुसार राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतीमध्ये निवडणूका घेण्याचे आज जाहीर झाले आहे. आज राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक निवडणूक आयुक्तांनी जाहीर केला आहे. महानगर पालिकांच्या निवडणूका जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. राज्यात एकूण मतदार १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार आहेत.एकूण १३ हजार ३५५ मतदान केंद्राची व्यवस्था केली आहे. इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारेच मतदान होणार आहे. १३ हजार ७२५ कंट्रोल युनिटची व्यवस्था आहे.
निवडणूक खर्च मर्यादेत वाढ
उमेदवारांच्या खर्च मर्यादेत यंदा वाढ करण्यात आली आहे.१५ लाख अ वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी , १० लाखाची वाढ सदस्यसपदासाठी . तर ११ लाख २५ हजार ब वर्ग परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी, ३ लाख ५० हजार खर्च मर्यादा सदस्य पदासाठी केली आहे. ७ लाख ५० हजार क वर्ग नगर परिषदेत अध्यक्षपदासाठीक्स , २ लाख ५० हजार रुपयांची खर्च मर्यादा सदस्यपदासाठी करण्यात आली आहे.
६ लाख नगर पंचायतीसाठी अध्यक्षपदासाठी आणि २ लाख २५ हजार खर्चाची मर्यादा सदस्यपदासाठी करण्यात आली आहे. मतदारांसाठी संकेत स्थळ विकसित केलं आहे. त्यावर सर्च फॅसिलिटी आहे. सर्च करून नाव आणि मतदान केंद्र शोधता येणार आहे. मतदारांसाठी मोबाईल अॅप तयार केला आहे. त्या द्वारे मतदार यादी, मतदान केंद्र आणि उमेदवारांची माहितीही मिळेल असेही राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
