IND vs SL Match : सुपर ओव्हरमध्ये भारताचा थरारक विजय
IND vs SL Match : सुपर ओव्हरमध्ये भारताचा थरारक विजय, अर्शदीपच्या भेदक गोलंदाजीने श्रीलंकेचा पराभवIND vs SL Match : सुपर ओव्हरमध्ये भारताचा थरारक विजय, अर्शदीपच्या भेदक गोलंदाजीने श्रीलंकेचा पराभव

IND vs SL Match : सुपर ओव्हरमध्ये भारताचा थरारक विजय, अर्शदीपच्या भेदक गोलंदाजीने श्रीलंकेचा पराभव

भारताचा थरारक विजय: सुपर ओव्हरमध्ये अर्शदीपच्या गोलंदाजीने श्रीलंकेचा पराभव.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • आशिया चषक 2025 मध्ये भारताने श्रीलंकेला सुपर ओव्हरमध्ये हरवले.

  • या विजयामुळे टीम इंडिया या स्पर्धेत अविजित राहिली. फायनलमध्ये दोन्ही संघांची पात्रता आधीच ठरली होती.

  • अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीने सामन्याचा दृष्याबदल केला.

आशिया चषक 2025 मध्ये भारताने श्रीलंकेला सुपर ओव्हरमध्ये हरवले. या विजयामुळे टीम इंडिया या स्पर्धेत अविजित राहिली. फायनलमध्ये दोन्ही संघांची पात्रता आधीच ठरली होती, त्यामुळे हा सामना फार महत्त्वाचा नव्हता. तरीही, श्रीलंकेने भारताला चांगली टक्कर दिली. अखेरीस भारताने आपल्या उत्कृष्ट खेळीने विजय मिळवला. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीने सामन्याचा दृष्याबदल केला.

अखेरच्या षटकात काय घडलं?

अखेरच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी 6 चेंडूत 12 धावांची आवश्यकता होती. हर्षित राणाकडे गोलंदाजीचा दायित्व होता. हर्षितने पहिल्याच चेंडूवर निसांकाला झेलबाद केलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर बाय १ धाव, चौथ्या चेंडूवर 2 धावा आणि पाचव्या चेंडूवर शनाकाने चौकार मारला. अखेरच्या चेंडूवर दोन धावांचा पुरवठा झाला, ज्यावर शनाकाने दुसरी धाव घेत स्ट्राईक एंडवर डाईव्ह मारला आणि झोपून राहिला. जर तो उठला असता तर तिसरी धाव होऊ शकली होती, कारण भारताच्या खेळाडूंना चुकले होते. यामुळे सामना बरोबरीत गेला आणि सुपर ओव्हरमध्ये गेला.

सुपर ओव्हरमध्ये काय घडलं?

सुपर ओव्हरमध्ये भारताकडून अर्शदीप सिंग गोलंदाजी करत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर कुसल परेरा झेलबाद झाला. त्यानंतर कुसल मेंडिस फलंदाजीला आला, आणि त्याने शनाकाला स्ट्राईक दिला. तिसऱ्या चेंडूवर काहीच धावा नाहीत, चौथ्या चेंडूवर वाईड दिला आणि मग भारताने झेलबाद केल्यावर संजूने धावबाद करून अपील केला. पंचांनी त्याला झेलबाद म्हणून मान्यता दिली. शनाकाने रिव्ह्यू घेतला आणि तो नाबाद राहिला. यामुळे भारताला विजयासाठी ३ धावांचं लक्ष्य ठरलं.

भारताने श्रीलंकेला 203 धावांचं लक्ष्य दिलं, आणि श्रीलंकेने सुरवातीला एक विकेट गमावली, पण नंतर पथुम निसांका आणि कुसल परेरा यांनी शानदार शतकी भागीदारी केली. पथुम निसांकाने यंदाच्या आशिया चषकातील पहिलं शतक मारलं, ज्यात त्याने 52 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांसह 101 धावा केल्या. कुसल परेराने 32 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारांसह 58 धावांची खेळी केली. भारताकडून हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग यांनी 1-1 विकेट घेतल्या.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. भारताने 5 बाद 202 धावा करत आपली सर्वोच्च धावसंख्या गाठली. या खेळीमध्ये भारताच्या सर्व फलंदाजांनी योगदान दिलं. अभिषेक शर्माने पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी करत भारताच्या मोठ्या धावसंख्येची स्थापना केली. त्याने 61 धावांची शानदार खेळी केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com