वर्ध्यातील एका हाताने टाळी वाजवणाऱ्या रोशनची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

वर्ध्यातील एका हाताने टाळी वाजवणाऱ्या रोशनची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

रोशन संजय लोखंडे या युवकाने एका हाताने 30 सेकंदात 180 पेक्षा अधिक टाळ्या वाजविल्या.
Published by :
Sagar Pradhan

भूपेश बारंगे।वर्धा : देवळी तालुक्यातील सोनोरा ढोक येथील रोशनची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. सोनोरा ढोक येथील रोशन संजय लोखंडे या युवकाने एका हाताने 30 सेकंदात 180 पेक्षा अधिक टाळ्या वाजविल्या आहे. याची दखल घेत ही'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेतली आहे.त्याच्या या अदभूत कलेला वाव देण्याकरिता 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2022 ' बुक मध्ये रोशनचे नाव नोंदविले गेले आहे.

एका हाताने टाळी वाजत नाही त्यासाठी दोन्ही हाताची आवश्यकता असते!आता म्हण जरा सांभाळूनच वापरावी लागेल ,कारण आता एका हाताने टाळू वाजू शकते. असे रोशन दाखवून दिले आहे. हात कोपऱ्यापासून सरळ रेषेत ठेवल्यानंतर हाताचा पंजा तळव्याकडे शेवटी पंजा आदळतो अन एका हाताने टाळी वाजते! दिसायला हे सरळ सोपं वाटतं असलं तरी हे प्रत्यक्षात तितकं सोपही नाही. वर्ध्यातील सोनोरा (ढोक) या एका छोट्याशा गावातील युवकाने हा पराक्रम करून दाखविला आहे. आणि राष्ट्रीय स्तरावर आपले व आपल्या गावाचे नाव उंच स्तरावर पोहचविले आहे. रोशन लोखंडे या युवकाने स्वतःचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदन वर्षाव केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com