Donald Trump Vs India : ट्रम्प यांची टीका, पण व्यवहार सुरूच! भारताचं जुन्या मित्र्याकडून अजूनही तेल खरेदी सुरुच

Donald Trump Vs India : ट्रम्प यांची टीका, पण व्यवहार सुरूच! भारताचं जुन्या मित्र्याकडून अजूनही तेल खरेदी सुरुच

भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्या प्रकरणी अलीकडील काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताबाबत सतत वादग्रस्त विधाने करत आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्या प्रकरणी अलीकडील काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताबाबत सतत वादग्रस्त विधाने करत आहेत. टॅरिफ वाढवून ट्रम्प यांनी भारताविषयी राग व्यक्त केला होता. अलास्कामधील व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी त्यांनी दावा केला की, “रशियाने आपला मोठं ग्राहक, भारत, गमावला आहे.” मात्र वास्तवात हा दावा पूर्णपणे चुकीचा ठरला आहे.

ट्रेड डीलमध्ये अपयश आल्याने अमेरिकेने भारतावर शुल्क लादले असले तरी त्याचा परिणाम तेल व्यापारावर झालेला नाही. उलट, भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करत आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यानुसार भारताने रशियन तेल आयात थांबवली आहे, परंतु उपलब्ध आकडेवारी वेगळेच चित्र दाखवते.

केप्लरच्या अहवालानुसार, जुलैमध्ये भारताने दररोज 1.6 दशलक्ष बॅरल रशियन तेल आयात केले होते. ऑगस्टमध्ये हा आकडा वाढून 2 दशलक्ष बॅरल प्रतिदिन झाला. यामुळे भारताच्या एकूण तेल आयातीपैकी जवळपास 38 टक्के पुरवठा रशियाकडून झाला आहे. उलट इराक आणि सौदी अरेबियाकडून खरेदी कमी करण्यात आली आहे.

अलास्कामधील ट्रम्प-पुतिन बैठकही निष्फळ ठरली. तीन तासांच्या चर्चेनंतरही युक्रेन युद्धबंदीवर कोणताही तोडगा निघाला नाही. ट्रम्प यांनी ही बैठक “प्रॉडक्टिव्ह” असल्याचे सांगितले, तर पुतिन यांनी “समाधानाची सुरुवात” म्हटले. परंतु भारतासंदर्भात ट्रम्प यांचे विधान वास्तवापासून दूर असल्याचे सिद्ध झाले आहे. भारत अजूनही रशियाचा महत्त्वाचा तेल ग्राहक आहे, आणि अमेरिकन दबावाला झुकण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com