Fourth Largest Economy : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे

Fourth Largest Economy : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सरत्या वर्षाच्या अखेरीस मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. उपलब्ध सरकारी आकडेवारी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अंदाजानुसार भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा टप्पा गाठला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सरत्या वर्षाच्या अखेरीस मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. उपलब्ध सरकारी आकडेवारी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अंदाजानुसार भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा टप्पा गाठला आहे. भारताचे एकूण सकल घरगुती उत्पादन (GDP) 4.18 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. याची अधिकृत घोषणा 2026 मध्ये होणार असली, तरी सध्याचे संकेत भारताच्या आर्थिक ताकदीकडे स्पष्टपणे निर्देश करत आहेत.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या अंदाजानुसार 2026 मध्ये भारताचा GDP 4.51 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकतो, तर त्याच काळात जपानचा GDP 4.46 ट्रिलियन डॉलर राहण्याची शक्यता आहे. या आकडेवारीवरून भारताने जपानला मागे टाकल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारचा दावा केवळ चौथ्या क्रमांकापुरता मर्यादित नसून, भारत येत्या अडीच ते तीन वर्षांत जर्मनीलाही मागे टाकत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार 2030 पर्यंत भारताचा GDP तब्बल 7.3 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. जागतिक अस्थिरता, युद्धजन्य परिस्थिती आणि व्यापारातील दबाव असूनही भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असल्याचे चित्र आहे.

मात्र, या चमकदार प्रगतीसोबत एक चिंताजनक वास्तवही समोर येत आहे. GDP वाढत असली तरी सर्वसामान्य भारतीयांचे प्रतिव्यक्ती उत्पन्न तुलनेने खूपच कमी आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये भारतातील प्रतिव्यक्ती उत्पन्न केवळ 2,694 डॉलर इतके आहे. हे जपानच्या तुलनेत सुमारे 12 पट आणि जर्मनीच्या तुलनेत जवळपास 20 पट कमी आहे. भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला आणि सर्वात तरुण देश असला, तरी रोजगारनिर्मिती हे मोठे आव्हान बनले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावून तसेच इतर देशांवर दबाव टाकून भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम रुपयाच्या अवमूल्यनावर दिसून आला असला, तरी एकूण आर्थिक वाढीवर फारसा परिणाम झालेला नाही. उलट भारताने चौथे स्थान मिळवत जागतिक अर्थव्यवस्थेत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com