India Post GDS भरती: दहावी पास तरुणांसाठी खुशखबर! बिना परीक्षा देता आता थेट पोस्टात नोकरीची संधी
ग्रामीण भागातील तरुणांसाठी भारतीय टपाल खात्याने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण डाक सेवक पदांसाठी तब्बल 28 हजारांहून अधिक जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही.
या भरतीत उमेदवारांची निवड थेट दहावीच्या गुणांवर होणार आहे. गुणांच्या आधारे यादी तयार केली जाईल आणि त्यातून निवड केली जाणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा ताण न घेता सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.
पगार किती मिळणार?
ग्रामीण डाक सेवकांना कामाच्या वेळेनुसार वेतन दिले जाते.
असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर : अंदाजे ₹10,000 ते ₹24,000
ब्रांच पोस्टमास्तर : अंदाजे ₹12,000 ते ₹29,000
पुढे काय संधी?
ही नोकरी फक्त सुरुवातीपुरती मर्यादित नाही. अनुभव मिळाल्यानंतर पुढील पदोन्नतीसाठी संधी उपलब्ध होतात. तसेच सेवाकालानंतर निवृत्ती लाभ आणि इतर फायदेही दिले जातात.
अर्ज कसा कराल?
31 जानेवारी 2026 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत.
अधिकृत वेबसाइटवर जा..(indiapostgdsonline.gov.in )
नोंदणी करा
माहिती व कागदपत्रे अपलोड करा
शुल्क भरून अर्ज पूर्ण करा
सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी ही सुवर्णसंधी नक्कीच दवडू नका!
थोडक्यात
ग्रामीण भागातील तरुणांसाठी भारतीय टपाल खात्याची मोठी संधी
ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी 28,000 हून अधिक जागांची भरती जाहीर
दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही
निवड प्रक्रिया थेट गुणवत्तेच्या आधारे केली जाणार

