KL Rahul Daughter : के. एल. राहुल-आथिया शेट्टीच्या लेकीचा पहिला फोटो समोर, नावही आहे खास
भारताचा स्टार खेळाडू के. एल. राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चिमुकलीचे आगमन झाले. गेल्या वर्षी आथिया आणि राहुल यांनी आई-वडील होणार असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले होते. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांना बाळ जन्माला येण्याची उत्सुकता लागली होती. मुलगी झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच कियारा आडवाणी. अर्जुन कपूर यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता.
अशातच आता राहुल आणि आथिया लेकीचा पहिला फोटो समोर आला आहे. याबरोबरच त्यांनी आपल्या लेकीचं नावदेखील जाहीर केले आहे. दोघांनीही लेकीबरोबरचा एक गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, "आमची लेक, आमचं सगळं आयुष्य, इवारा, देवाची भेट'. दरम्यान या पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.
काय आहे नावाचा अर्थ ?
सोशल मीडियावर फोटो शेअर करत के एल राहुल आणि आथिया शेट्टी यांनी फोटो शेअर केला. यामध्ये त्यांनी मुलीचे नाव इवारा असे सांगितले असून पुढे नावाचा अर्थदेखील सांगितला आहे. इवारा म्हणजे देवाची भेट असा अर्थ होतो. त्यांच्या लेकीबरोबरच्या फोटोला चांगलीच पसंती मिळाली आहे. तसेच अनेकांनी शुभेच्छांचा वर्षावदेखील केला आहे.
2023 साली केएल राहुल आणि आथिया शेट्टी लग्नबंधनात अडकले होते. खंडाळा येथील फर्महाऊसमध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नासाठी त्यांचे कुटुंब आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. दरम्यान गेल्या वर्षी त्यांनी फोटो पोस्ट करत आईवडील होणार असल्याची घोषणा केली होती.