Special Trains : भारतीय रेल्वेची विशेष तयारी…,छठ आणि दिवाळीसाठी स्पेशल ट्रेन धावणार
थोडक्यात
देशात दिवाळी आणि छठसणाची तयारी जोरात सुरू
रेल्वेने या गर्दी लक्षात घेऊन, अतिरिक्त ट्रेन चालवण्याची तयारी केली
1 ऑक्टोबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत स्पेशल ट्रेन चालवण्यात येतील
देशात दिवाळी आणि छठसणाची तयारी जोरात सुरू आहे. लोक आपल्या गावी सुरक्षित आणि आरामात पोहोचण्यासाठी ट्रेन-बस बुकिंगमध्ये व्यस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर, भारतीय रेल्वेने या सणासाठी विशेष तयारी केली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली.
12,000 स्पेशल ट्रेन
छठ आणि दिवाळीसाठी मागील वर्षी 7,500 स्पेशल ट्रेन (Special Trains) चालवल्या होत्या, तर रेल्वेची क्षमता यंदा वाढवून सुमारे 12,000 स्पेशल ट्रेन चालवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 150 ट्रेन यामध्ये पूर्णपणे अनारक्षित श्रेणीसाठी असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी त्या अंतिम क्षणी सुरू केल्या जातील. दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरांहून या सणाच्या (Diwali And Chhath) काळात उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांची (Indian Railways Special Preparations) संख्या खूप वाढते. रेल्वेने या गर्दी लक्षात घेऊन, अतिरिक्त ट्रेन चालवण्याची तयारी केली आहे.
संचालनाची कालमर्यादा
रेल्वेच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 1 ऑक्टोबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत स्पेशल ट्रेन चालवण्यात येतील.
वंदे भारत स्लीपरचे मोठे अपडेट
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या प्रगतीबाबत सांगितले की, तिचे परीक्षण पूर्ण झाले असून, दोन रेक एकाच वेळी सुरू केले जातील. दुसरा रेक 15 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध होईल.
नवीन रूट आणि सुविधा
– लखनऊ-जंक्शन ते सहारनपुर दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळतील.
– मदार-जंक्शन (अजमेर) ते दरभंगा दरम्यान नवीन साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस सुरू होईल, जी कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी उपयुक्त ठरेल.
– केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या मते, देशातील 70 पैकी 29 रेल्वे विभागांमध्ये वेळापालन 90% पेक्षा जास्त झाले आहे, जे प्रवाशांच्या सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी महत्त्वाचे आहे.