Stock Market : भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण; ट्रम्प यांच्या नव्या घोषणेमुळे गुंतवणूकदार चिंतेत
Stock Market : भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण; ट्रम्प यांच्या नव्या घोषणेमुळे गुंतवणूकदार चिंतेतStock Market : भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण; ट्रम्प यांच्या नव्या घोषणेमुळे गुंतवणूकदार चिंतेत

Stock Market : भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण; ट्रम्प यांच्या नव्या घोषणेमुळे गुंतवणूकदार चिंतेत

ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण
Published by :
Team Lokshahi
Published on

Indian Stock Market Plunges After Trump's Tariff Announcement : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या नवीन टॅरिफ (आयात शुल्क) घोषणेचा भारतीय शेअर बाजारावर थेट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजारात 300 अंकांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली असून, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळत आहे.

आज सकाळी व्यवहार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 423 अंकांची म्हणजेच सुमारे 0.35 टक्क्यांची घसरण झाली असून तो 80,120 या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी निफ्टी निर्देशांकात देखील 110 अंकांची म्हणजे 0.45 टक्क्यांची घसरण झाली असून निफ्टीने 24,464 अंकांवर सुरुवात केली. ट्रम्प यांनी अलीकडेच भारतातून आयात होणाऱ्या उत्पादनांवर अतिरिक्त 25 टक्के आयात शुल्क लावण्याचा इशारा दिला आहे. याआधी लागू करण्यात आलेल्या 25 टक्क्यांच्या शुल्काची अंमलबजावणी आजपासून सुरू होत आहे. यामुळे भारतीय निर्यातदार कंपन्यांवरील दबाव वाढू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येतो.

प्रमुख शेअर्सची स्थिती:

व्यवहाराच्या सुरुवातीला अनेक दिग्गज कंपन्यांचे समभाग खाली आले. घसरण झालेल्या काही प्रमुख शेअर्स:

टाटा मोटर्स: 1.49%

सिएट: 1.21%

टाटा स्टील: 0.82%

अदानी पोर्ट्स: 0.97%

इटरनल: 0.84%

एसबीआय: 0.82%

रिलायन्स इंडस्ट्रीज: 0.57%

महिंद्रा अँड महिंद्रा: 0.61%

टीसीएस, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि आयसीआयसीआय बँक यांच्यात देखील किरकोळ घसरण नोंदवण्यात आली.

किंचित वाढलेले समभाग:

काही कंपन्यांच्या समभागांनी मात्र या नकारात्मक वातावरणातही सकारात्मक कामगिरी केली.

बजाज होल्डिंग्स: 4.39%

पिडिलाइट: 2.00%

हिरो मोटोकॉर्प: 1.00%

आयटीसी व नेस्ले इंडिया: किरकोळ वाढ

एचडीएफसी बँक: सौम्य वाढ

अमेरिकेच्या नव्या व्यापार धोरणांमुळे भारताच्या निर्यात बाजारावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम आजच्या बाजारात स्पष्टपणे दिसून आला. ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ घोषणेमुळे आगामी काही दिवसांतही बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला विश्लेषकांकडून दिला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com