IndiGo
IndiGo

IndiGo : इंडिगोवरील संकट आणखी गडद होणार; 8 डिसेंबरपासून विमानांची संख्या कमी केली जाणार

इंडिगो गेल्या तीन दिवसांपासून गंभीर अडचणींना सामोरे जात आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(IndiGo) इंडिगो गेल्या तीन दिवसांपासून गंभीर अडचणींना सामोरे जात आहे. गुरुवारी कंपनीने तब्बल ५५० उड्डाणे रद्द केली.केबिन क्रूची कमतरता, तांत्रिक अडचणी आणि इतर ऑपरेशनल समस्यांमुळे मोठ्या प्रमाणात सेवा बाधित होत आहेत.

यातच आता इंडिगोवरील संकट आणखी गडद होणार असल्याची शक्यता असून 8 डिसेंबरपासून विमानांची संख्या कमी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. फेब्रुवारीपर्यंत विमानांची संख्या पूर्ववत करण्यात येणार असून नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अधिकाऱ्यांनी इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.

8 डिसेंबर पासून विमानांची संख्या कमी केली जाणार आणि फेब्रुवारी पर्यंत पूर्ववत करणार असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Summery

  • इंडिगोवरील संकट आणखी गडद होणार

  • 8 डिसेंबरपासून विमानांची संख्या कमी केली जाणार

  • फेब्रुवारीपर्यंत विमानांची संख्या पूर्ववत करणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com