IndiGo : इंडिगोचे विमान उड्डाण अद्यापही विस्कळीत; आतापर्यंत एकूण 827 कोटी रुपयांचे परतावे जारी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(IndiGo ) इंडिगो गेल्या तीन दिवसांपासून गंभीर अडचणींना सामोरे जात आहे. कंपनीने अनेक उड्डाणे रद्द केली. केबिन क्रूची कमतरता, तांत्रिक अडचणी आणि इतर ऑपरेशनल समस्यांमुळे मोठ्या प्रमाणात सेवा बाधित होत आहेत.
इंडिगो एअरलाईनमुळे पुणे, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांची कालपासून मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या लोकांनी इंडिगोची बुकींग केली आहे त्यांना याचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार असल्याची माहिती मिळत असून सोमवारीही 562 विमाने रद्द करण्यात आली. इंडिगोच्या सेवेत गोंधळ झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे पाच हजार उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गोंधळाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी येत्या बुधवारी डीजीसीएची उच्चस्तरीय समिती कंपनीचे प्रमुख पीटर एल्बिस यांना चौकशीसाठी बोलावणार आहेत.
Summery
इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार
सोमवारीही ५६२ विमाने रद्द
इंडिगोच्या सेवेत गोंधळ झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे पाच हजार उड्डाणे रद्द
