IndiGo Crisis : IndiGoची मोठी घोषणा; प्रवाशांचे पैसे परत मिळणार, री-शेड्युलिंग शुल्क शून्य

IndiGo Crisis : IndiGoची मोठी घोषणा; प्रवाशांचे पैसे परत मिळणार, री-शेड्युलिंग शुल्क शून्य

देशातील सर्वांत मोठ्या विमानसेवा इंडिगोसमोर उड्डाण रद्दीकरणाची समस्या पाचव्या दिवशीही कायम आहे. शनिवारी (६ डिसेंबर) इंडिगोने ४०० हून अधिक उड्डाणे रद्द केली,
Published by :
Varsha Bhasmare
Published on

देशातील सर्वांत मोठ्या विमानसेवा इंडिगोसमोर उड्डाण रद्दीकरणाची समस्या पाचव्या दिवशीही कायम आहे. शनिवारी (६ डिसेंबर) इंडिगोने ४०० हून अधिक उड्डाणे रद्द केली, तर शुक्रवारी तब्बल १,००० उड्डाणे रद्द झाल्यामुळे हजारो प्रवासी विमानतळावर अडकले. तांत्रिक अडचणी, खराब हवामान, क्रू-रोस्टरमध्ये बदल आणि ऑपरेशनल कोलमडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. प्रचंड संताप प्रवाशांचा व्यक्त होत आहे, मेटाकुटीला आलेल्या प्रवाशांचे व्हिडिओ आणि विमानतळावरचे फोटो तर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

केंद्र सरकारचा कडक आदेश

शनिवारी इंडिगोला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (MoCA) आदेश दिला की, सर्व प्रलंबित परतावे रविवार, ७ डिसेंबर २०२५ रात्री ८ वाजेपर्यंत पूर्ण करावेत. तसेच, रद्द किंवा उशिरा झालेल्या उड्डाणासाठी कोणत्याही प्रवाशांकडून री-शेड्युलिंग शुल्क आकारू नये. मंत्रालयाने स्पष्ट केले की, तातडीची कारवाई नियमांचे पालन न केल्यास होईल. यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:

  • तिकीट रद्द करण्याची इच्छा असलेल्या प्रवाशांना पूर्ण परतावा.

  • उड्डाण रद्द किंवा विलंबित झाल्यास कोणताही री-शेड्युलिंग शुल्क न आकारणे.

  • परिस्थिती स्थिर होईपर्यंत भाड्यावरील फेअर कॅप्स कायम ठेवणे.

प्रवासी सहाय्य केंद्राची स्थापना

मंत्रालयाने मोठ्या प्रमाणावर प्रवासी अडकले असल्यामुळे इंडिगोला "प्रवासी समर्थन व परतावा सेल" उभारण्यास सांगितले. या केंद्राचे उद्दिष्ट प्रवाशांशी सक्रिय संपर्क साधणे, तातडीने परतावे प्रक्रिया करणे, पर्यायी उड्डाणांची सोय करणे आणि रिकव्हरी प्रक्रियेवर सतत फॉलो-अप ठेवणे हे आहे. केंद्रांमुळे मंत्रालयाचा म्हणणे आहे की, स्पष्ट संवाद आणि सहाय्य प्रवाशांचा ताण कमी होईल.

  • हरवलेल्या सामानासाठी ४८ तासांची डेडलाइन

  • विलंब आणि रद्दीकरणामुळे प्रवाशांचे सामान विमानतळांवर हरवलेले आहे. मंत्रालयाने इंडिगोला आदेश दिला की,

  • हरवलेले/विलंबित सामान ४८ तासांच्या आत प्रवाशांच्या घरी पोहोचवावे.

  • सामानाची स्थिती प्रवाशांना सतत कळवावी.

  • Passenger Rights नियमांनुसार भरपाई द्यावी.

इंडिगोची प्रतिक्रिया

इंडिगोने सरकारच्या आदेशानंतर निवेदन जारी केले की, रिफंड मूळ पेमेंट पद्धतीवर सर्व रद्द उड्डाणांचे ऑटो-रिफंडद्वारे जमा केले जातील. तसेच, रद्दीकरण शुल्क ५ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यानच्या सर्व तिकिटांसाठी पूर्णपणे माफ केले आहे, आणि कोणताही खर्च री-शेड्युलिंगसाठीही आकारला जाणार नाही.

उड्डाण रद्दीकरणाचा देशभरातील परिणाम

  • ४,००० हून अधिक उड्डाणे संपूर्ण देशभरात अंदाजे विस्कळीत झाली आहेत.

  • मुंबई (CSMIA) : १०९ उड्डाणे रद्द

  • दिल्ली (IGI) : १०६ उड्डाणे रद्द

  • हैदराबाद : ६० पेक्षा अधिक उड्डाणे रद्द

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com