InflationTeam Lokshahi
ताज्या बातम्या
Inflation | महागाई होणार आणखी तीव्र; सलून- पार्लरच्या दरात वाढ
दिवसेंदिवस महागाईत वाढ होताना दिसत आहे.
दिवसेंदिवस महागाईत वाढ होताना दिसत आहे. सामान्यांच्या खिशाला या महागाईमुळे चांगलीच कात्री लागली आहे. सर्व गोष्टींमध्ये महागाई होत असताना आता अजून एक भर पडली आहे ती म्हणजे सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांची दरवाढ केली आहे. दाढी करणं, केस कापणे तसेच महिलांच्या सौंदर्य प्रसाधनेसुद्धा महाग होणार आहेत.
या निर्णय राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला आहे. ही दरवाढ 1 मे म्हणजेच कामगार दिनापासून लागू करण्यात येणार आहे
नागरिकांनी देखील दरवाढीला सहकार्य करावे, असे अवाहन सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद यांनी केले आहे.