Aamir Khan : 25 IPS अधिकारी बंगल्यावर दाखल झाल्याने आमिर खान चर्चेत; कारणही समोर
बॉलिवूडचा स्टार अभिनेता अमिर खानच्या घरावर 25 आयपीएस अधिकारी दाखल झाले असल्याची माहिती समोर येत आहे. यासंबंधीत एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. ज्यात पोलिसांच्या गाड्या त्याच्या घरातून बाहेर येताना दिसत आहेत. अमिर खानच्या वांद्रेतील घराची ही दृश्य आहेत.
आयपीएस अधिकाऱ्यांची एक टीम आमिर खानच्या घरी का आली याची सर्वत्र चर्चा सगळीकडे रंगली आहे. मात्र याबाबत अमिर खान किंवा त्याच्या टीमकडून कोणतही वक्तव्य आलेल नाही. आमिर खानचा नुकताच 'सितारे जमीन पर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यामधून त्याला पुरेसा फायदा झाला नाही. आमिर खानचा हा चित्रपट फ्लॉप झाल्याचं देखील पाहायला मिळाल.
त्याआधी त्याच दुसरा घटस्फोट झाला आणि त्यानंतर साठीला टेकलेल्या आमिर खानने तिसऱ्या गर्लफ्रेंडची भेट घडवून दिली. यानंतर आता तो मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याच्या घरावर आयपीएस अधिकारी दाखल झाले असून असं म्हटलं जातय की, ही केवळ एक भेट होती. मात्र याचा अद्याप सुगाव लागलेला नाही.