EPFO खात्यात व्याजाचे पैसे जमा नाही झाले,  चिंता नको, जाणून घ्या कारण
EPFO खात्यात व्याजाचे पैसे जमा नाही झाले, चिंता नको, जाणून घ्या कारण EPFO खात्यात व्याजाचे पैसे जमा नाही झाले, चिंता नको, जाणून घ्या कारण

EPFO Users : पीएफ खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! तुमच्याही खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले नाहीत?; जाणून घ्या उपाय

EPFO व्याज: PF खात्यात व्याज जमा नाही? काळजी नको, जाणून घ्या कारण आणि उपाय.
Published by :
Riddhi Vanne

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2024-25 आर्थिक वर्षात खातेदारांच्या खात्यात 8.25 दराने व्याज टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र काही खातेधारकांच्या PF अकाउंटमध्ये जर अजूनही पैसे जमा झाले नसतील तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. EPFO दरवर्षी व्याज जमा करते, त्यामुळे व्याज जमा होण्यास थोडा वेळ लागू शकतो. खात्याची पूर्ण तपासणी करून हे व्याज खातेधारकांच्या खात्यामध्ये टाकले जात असल्यामुळे काही वेळेला या गोष्टींसाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे जर तुमच्या पीएफ (EPF) खात्यात व्याज जमा झाले नसेल, तर तुम्ही काही गोष्टींची खातरजमा करा.

1. 1) EPFO ग्राहक सेवा पोर्टल

Google
GoogleGoogle

तुम्ही तुमच्या जवळच्या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता किंवा EPFO च्या ग्राहक सेवा पोर्टलवर (customer service portal) तक्रार दाखल करू शकता. तसेच, तुम्ही EPFO च्या टोल-फ्री क्रमांकावर किंवा जवळच्या EPFO ​​कार्यालयात संपर्क साधू शकता.

2. 2) KYC तपशील तपासा

Google
GoogleGoogle

तुमचे आधार, पॅन आणि बँक खाते EPFO ​​पोर्टलवर योग्यरित्या लिंक केलेले आणि व्हेरिफाय केलेले आहे का ते तपासा.

3. 3) पासबुक तपासा

Google
GoogleGoogle

EPFO ​​सदस्य पोर्टल किंवा उमंग ॲप वापरून तुमच्या पासबुकमध्ये व्याज जमा झाले आहे का ते तपासा. पासबुकचे लेटेस्ट अपडेट चेक करा.

4. 4)तक्रार दाखल करा

Google
GoogleGoogle

EPFO च्या अधिकृत तक्रार पोर्टलवर (complaint portal) [https://epfigms.gov.in] यावर तक्रार दाखल करा. EPFO हेल्पडेस्कच्या टोल-फ्री क्रमांकावर (14470) संपर्क साधा. किंवा तुमच्या जवळच्या EPFO ​​कार्यालयात भेट द्या.

5. 5) 10-15 दिवस वाट पाहा.

Google
GoogleGoogle

EPFO ​​ने व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, त्यामुळे काही दिवसात तुमच्या खात्यात व्याज जमा होण्याची शक्यता आहे.

6. 6) संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा:

Google
GoogleGoogle

तुमच्या या समस्येबद्दल संबंधित अधिकाऱ्याला सांगा. गरज पडल्यास UAN नंबर आणि ओळखपत्र घेऊन सरळ जवळच्या EPFO कार्यालयाला भेट द्या.

7.

EPFO दरवर्षी व्याज जमा करते, त्यामुळे व्याज जमा होण्यास थोडा वेळ लागू शकतो. तुम्ही 3 वर्षांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय असलेल्या खात्यामध्ये व्याज मिळण्यास पात्र नसाल, किंवा जर तुम्ही नोकरी बदलली असेल आणि तुमचे खाते हस्तांतरित केले नसेल, तर तुमच्या जुन्या खात्यावर फक्त 3 वर्षांसाठी व्याज मिळेल. तुम्ही EPFO ​​च्या वेबसाइटला भेट देऊन किंवा उमंग ॲप वापरून तुमच्या खात्यातील शिल्लक आणि व्याजाची माहिती तपासू शकता.

8.

हेही वाचा...

EPFO खात्यात व्याजाचे पैसे जमा नाही झाले,  चिंता नको, जाणून घ्या कारण
Gold Rate : सोने आता लाखोंच्या पार ; जाणून घ्या आजचा दर
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com