दानपेटीमध्ये पडला आयफोन, मंदिर प्रशासनाने परत करण्यास दिला नकार
तमिळनाडूमध्ये तिरुपोरुर येथील अरुलमिगु कंदस्वामी मंदिराच्या दानपेटीमध्ये चुकून एका भाविकाचा आयफोन पडला. मात्र, त्यानंतर मंदिर प्रशासनने आयफोन परत करण्यास साफ नकार दिला आहे. तमिलनाडु सरकारच्या हिंदू धार्मिक आणि धर्मार्थ बंदोबस्ती विभागने याबाबत आपलं स्पष्टीकरण ही दिलं आहे. यामध्ये म्हटलंय की आयफोन परत केला जाऊ शकत नाही. मंदिर प्रशासनने याबाबत नियमांचे कारण पुढे केलं आहे. काय आहे हा नियम जाणून घेऊया.
नेमकं काय घडलं?
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना श्री कंदस्वामी मंदिरात घडली आहे. या भाविकाचे नाव दिनेश आहे. दिनेश हे तिरुवल्लूर जिल्ह्यातील विनायगपुरममध्ये राहतात. 18 अक्टूबर रोजी दिनेश आपल्या परिवारासह मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन दान करत असताना त्यांचा आयफोन हातातून निसटला आणि दानपेटीमध्ये जाऊन पडला. त्यानंतर दिनेश यांनी मंदिर प्रशासनाने आपला आयफोन दानपेटीमधून काढून परत करण्याची मागणी केली.
दोन महिन्यांनंतर शुक्रवार, 20 डिसेंबर रोजी दानपेटी उघडण्यात आली आणि आयफोन दानपेटीमधून काढण्यात आला. मंदिर प्रशासनाने दिनेश यांना कळवलं की आयफोन दानपेटीमधून काढण्यात आला आहे. मात्र, आयफोन तुम्हाला परत केला जाणार नाही, कारण आता आयफोन मंदिराची संपत्ती आहे. तसेच तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यामधून आपला डेटा ट्रान्सफर करून घेऊ शकता. मात्र, दिनेश यांनी नकार दिला आणि मंदिर प्रशासनाकडे आयफोन परत करण्याची मागणी उचलून धरली.
तमिळनाडू सरकारचं याबाबत स्पष्टीकरण
तमिळनाडू सरकारने हिंदू धार्मिक आणि धर्मार्थ बंदोबस्ती (HR & CE) विभागाचे मंत्री पीके शेखर बाबू यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी म्हटलं की संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करू. गरज पडल्यास भाविकाला आयफोनचा मोबदला देण्याचा विचार केला जाऊ शकतो.
याआधीही अशी घटना घडली होती
मे 2023 मध्ये अशीच एक घटना समोर आली होती. केरळमधील अलप्पुझा येथील मंदिरात एका महिलेची सोन्याची माळ दानपेटीमध्ये चुकून पडली होती. या घटनेनंतर मंदिर प्रशासनाने महिलेला त्याच वजनाच्या सोन्याची दुसरी माळ बनवून दिली होती. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 1975 मधील नियमांनुसार, दानपेटीमध्ये टाकलेली कोणतीही वस्तू परत केली जात नाही. दानपेटीमध्ये पडलेली वस्तू मंदिराची संपत्ती असते असं सांगण्यात आलं होतं.
आयफोन दानपेटीमधून काढत असतानाची दृश्यं-