Sold Players List in IPL 2026 Auction
Sold Players List in IPL 2026 AuctionSold Players List in IPL 2026 Auction

Sold Players List in IPL 2026 Auction : मिनी ऑक्शनचा थरार! आज कुठल्या संघाने कोणता खेळाडू उचलला? संपूर्ण खरेदीची यादी एका क्लिकवर

आयपीएल 2026 साठीचा मिनी लिलाव अबू धाबी येथे सुरू झाला आहे. सुरुवातीला लिलाव फारसा रंगतदार वाटला नाही आणि काही खेळाडूंना खरेदीदार मिळाले नाहीत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

(Sold Players List in IPL 2026 Auction) आयपीएल 2026 साठीचा मिनी लिलाव अबू धाबी येथे सुरू झाला आहे. सुरुवातीला लिलाव फारसा रंगतदार वाटला नाही आणि काही खेळाडूंना खरेदीदार मिळाले नाहीत. मात्र कॅमेरुन ग्रीनचे नाव पुढे येताच लिलावाला वेग आला. अपेक्षेप्रमाणे कोलकाता नाइट रायडर्सने ग्रीनसाठी तब्बल 25.20 कोटी रुपयांची मोठी रक्कम मोजली. या लिलावात काही खेळाडू थेट खरेदी झाले, तर काहींची देवाणघेवाण संघांमध्ये करण्यात आली.

या मिनी लिलावात दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर हा सर्वात आधी विकला गेलेला खेळाडू ठरला. खाली कोणत्या संघाने कोणते खेळाडू घेतले आणि कोणते खेळाडू कायम ठेवले याची सोपी माहिती दिली आहे.

चेन्नई सुपर किंग्स

नवीन घेतलेला खेळाडू:

अकील होसैन – 2 कोटी

संघात कायम ठेवलेले खेळाडू:

एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, रामकृष्ण घोष, खलील अहमद, मुकेश चौधरी, नाथन एलिस, अंशुल कंबोज, जेमी ओवर्टन, गुरजपनीत सिंह, नूर अहमद, श्रेयस गोपाल आणि संजू सॅमसन (ट्रेड)

दिल्ली कॅपिटल्स

नवीन खरेदी:

डेविड मिलर – 2 कोटी

बेन डकेट – 2 कोटी

कायम ठेवलेले खेळाडू:

अक्षर पटेल, कुलदीप यादव, करुण नायर, समीर रिजवी, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, आशुतोष शर्मा, विपराज निगम, माधव तिवारी, त्रिपूर्ण विजय, अजय मंडल, मुकेश कुमार, मिचेल स्टार्क, टी. नटराजन, दुष्मंता चमीरा आणि नीतीश राणा (ट्रेड)

गुजरात टायटन्स

संघात कायम असलेले खेळाडू:

शुभमन गिल, साई सुदर्शन, राशिद खान, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जोस बटलर, निशांत सिंधु, वॉशिंगटन सुंदर, अरशद खान, शाहरुख खान, राहुल तेवतिया, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, गुरनूर सिंह बराड, मानव सुथार, साई किशोर आणि जयंत यादव

कोलकाता नाइट रायडर्स

नवीन खेळाडू:

कॅमेरुन ग्रीन – 25.20 कोटी

फिन अ‍ॅलन – 2 कोटी

मतीषा पतिराना – 18 कोटी

कायम ठेवलेले:

वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंह, सुनील नरेन, अंगकृष रघुवंशी, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, रोवमन पावेल, रमनदीप सिंह, अनुकूल रॉय, हर्षित राणा, वैभव अरोरा आणि उमरान मलिक

लखनऊ सुपर जायंट्स

नवीन घेतलेले खेळाडू:

वानिंदू हसरंगा – 2 कोटी

एनरिक नॉर्खिया – 2 कोटी

संघात असलेले खेळाडू:

ऋषभ पंत, मिचेल मार्श, एडन मार्करम, आयुष बडोनी, अब्दुल समद, निकोलस पूरन, शाहबाज अहमद, आवेश खान, मोहसिन खान, मोहम्मद शमी आणि अर्जुन तेंडुलकर (ट्रेडसह इतर खेळाडू)

मुंबई इंडियन्स

नवीन खरेदी

क्विंटन डी कॉक – 1 कोटी

कायम ठेवलेले खेळाडू:

रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर आणि इतर खेळाडू

पंजाब किंग्स

संघात कायम असलेले खेळाडू:

श्रेयस अय्यर, प्रभसिमरन सिंह, अर्शदीप सिंह, नेहाल वढेरा, मार्कस स्टोइनिस, मार्को यानसन, युजवेंद्र चहल, लॉकी फर्ग्युसन आणि इतर

राजस्थान रॉयल्स

नवीन घेतलेला खेळाडू:

रवि बिश्नोई – 7.20 कोटी

कायम ठेवलेले:

यशस्वी जायसवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, शिमरॉन हेटमायर, रवींद्र जडेजा आणि सॅम करन (ट्रेड)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

नवीन खेळाडू:

वेंकटेश अय्यर – 7 कोटी

जॅकब डफी – 2 कोटी

संघात कायम:

विराट कोहली, रजत पाटीदार, फिल सॉल्ट, जॉश हेजलवुड, भुवनेश्वर कुमार, टिम डेविड आणि इतर

सनरायजर्स हैदराबाद

कायम ठेवलेले खेळाडू:

पॅट कमिन्स, ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिख क्लासन, ईशान किशन, नीतीश रेड्डी, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट आणि इतर

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com