Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांना शिवसेनेकडून डावललं जातंय?
भाजप शिवसेना बैठकीला सुरुवात झाली आहे. पुण्यातील रामी ग्रँड हॉटेलमध्ये दोन्ही पक्षाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, धीरज घाटे, निलम गोऱ्हे, विजय शिवतारे, नाना भानगिरे यांच्या उपस्थित बैठकीला सुरुवात झाली आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षात चर्चा करण्यात येत आहे.
Shivsena
भाजप आणि शिवेसना यांच्यातील चर्चेला पुणे महापालिका निवडणुकीसाठी जागांच्याबाबत सुरुवात झाली आहे. भाजपवर टीका करणे रवींद्र धंगेकर यांना भोवल्याचं बोललं जातंय. रवींद्र धंगेकर यांना पुण्यातील भाजप शिवसेना पक्षाच्या बैठकीला आमंत्रण देण्यात आलं नाही.पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या बैठक सुरु आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत आल्यानंतर रवींद्र धंगेकर यांच्याकडे शिवसेनेचे पुणे शहराचे महानगर प्रमुखपद देण्यात आलं आहे. मात्र, भाजप मधील नेत्यांवर टीका केल्याने आज त्यांना बैठकीचे आमंत्रण नाही, अशी माहिती आहे.
Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांना शिवसेनेकडून डावललं जातंय?
पुण्यात भाजप नाही तर शिवसेनेकडून रवींद्र धंगेकरांना डावलण्यात येत आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या महायुतीच्या बैठकीचं निमंत्रण भाजपने भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिलं आहे अशी माहिती भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली आहे. तर शिवसेनेने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना दिल्याची माहिती आहे. धंगेकरांना शिवसेनेच निमंत्रण दिलं नसल्याचं समजतंय. शिवसेना महायुतीत 35-40 जागांसाठी भाजपकडे प्रस्ताव देणार आहे, अशी चर्चा आहे आणि मात्र 165 जागा लढवण्यावर रविंद्र धंगेकर ठाम आहेत.
दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर विजय मिळवला होता. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा भाजपच्या हेमंत रासने यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यानच्या काळात रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. रवींद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काही काळ शांत होते. मात्र, भाजप नेत्यांवर जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकर यांनी हल्लाबोल केला ह
