Gold Rate : 2026 या वर्षी सोन्याचा भाव 2 लाखांवर? जाण्याची शक्यता...
सोने आणि चांदीच्या भावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठे-चढउतार पाहायला मिळत आहेत. या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत दिवाळीआधी चांगलीच वाढली होती. दिवाळीनंतर मात्र सोने आणि चांदीचा भाव पडला. आता पुन्हा एकदा हे दोन्ही धातू चांगलेच चमकताना दिसत आहेत. चांदीच्या भावाने तर विक्रीम 2 लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. दरम्यान, सोने, चांदीची दिशा आता नव्या वर्षात कोणती असेल? दोन्ही धातूंचा भाव वधारणार की किंमत कमी होणार? असे विचारले जात आहे. एक अंदाजानुसार तर एक लाख 90 हजार रुपयांपर्यंत सोन्याचा भाव थेट वाढण्याची शक्यता आहे.
नेमका नवा अंदाज काय?
मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या भावात 2025 साली आतापर्यंत साधारण 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही तेजी 2026 सालीदेखील कायम राहणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. याबाबतचा आता एक मोठी भविष्यवाणी समोर आली आहे. 2026 या वर्षी सोन्याचा भाव वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलचे सीईओ डेव्हिड टॅट यांनी सध्याच्या तुलनेत तब्बल 39 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, असे सांगितले आहे. हा अंदाज खरा ठरला तर जागतिक बाजारात सोन्याचा भाव 6 हजार डॉलरचा टप्पा पार करेल. भारतीय रुपयांत सांगायचे झाले तर 1 लाख 90 रुपयांपर्यंत सोन्याचा भाव थेट वाडण्याची शक्यता आहे.
सोन्यात अशी होऊ शकते वाढ
टॅट यांनी सांगितल्यानुसार सोने, चांदीचा भाव भविष्यात कमी होण्याची शक्यता नाही. सोन्याचा भाव 2026 साली 6000 डॉलर्स प्रती औंस म्हणजेच 541,920 रुपये प्रति औंस (1.90 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम) रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. दरम्यान, सोन्याचा भाव 4,321 डॉलर्स प्रति औंसवर बुधवारी पोहोचला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा भाव 60 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आता पुढच्या वर्षीदेखील सोन्याचा भाव असाच वाढू शकतो, अशी शक्यता टॅट यांनी व्यक्त केली आहे.
