Ishwarpur News :  इस्लामपूरच्या ईश्वरपूर नामकरणाला केंद्र सरकारची मंजुरी...

Ishwarpur News : इस्लामपूरच्या ईश्वरपूर नामकरणाला केंद्र सरकारची मंजुरी...

राज्य सरकारने इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर केले होते. या नामकरणाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. आता ईश्वरपूर असे इस्लापूरचे अधिकृत नाव असणार आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • राज्य सरकारने इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर केले

  • नामांतराचा शासकीय प्रवास पूर्ण

  • नामकरणाच्या मागणीचा प्रदीर्घ इतिहास

राज्य सरकारने इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर केले होते. या नामकरणाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. आता ईश्वरपूर असे इस्लापूरचे अधिकृत नाव असणार आहे. पावसाळी अधिवेशनात मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लापूरचे नाव ईश्वरपूर करण्याची घोषणा केली होती.

राज्य मंत्रिमंडळाने देखील या नामकरणार मान्यता दिली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर केंद्र सरकारकडे नामकरणाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या नामकरणाला दिलेल्या मंजुरीने प्रथम ईस्लापूर शहराचे नाव ईश्वर करण्यात येईल. त्यानंतर ईश्वरपूर नगरपरिषद, ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ असे नामकरण करण्यात येईल.

नामांतराचा शासकीय प्रवास पूर्ण

राज्य सरकारने शुक्रवार १८ जुलै रोजी इस्लामपूर शहराचे 'ईश्वरपूर' असे नामांतरण करण्याच्या नगरपालिकेच्या प्रस्तावास विधिमंडळात मंजुरी दिली होती आणि तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवला होता. आत दिनांक १४ ऑक्टोबर रोजी केंद्र शासनाच्या भारतीय सर्वेक्षण विभागाने 'ईश्वरपूर' या नामांतरणास मंजुरी देत तसा शासकीय अध्यादेश काढला आहे. याबरोबरच, भारतीय डाक विभाग आणि भारतीय रेल्वे खात्यालाही त्यांच्या दप्तरी शहराचे नाव बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे नामांतराची प्रक्रिया अधिकृतपणे पूर्ण झाली आहे.

नामकरणाच्या मागणीचा प्रदीर्घ इतिहासः

ईश्वरपूर' नामकरणाच्या मागणीला प्रदीर्घ इतिहास आहे.

१९२७: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी इस्लामपूरला भेट दिली असता त्यांनी शहराचा उल्लेख 'ईश्वरपूर' असा केला होता. त्यानंतर संघाचे तत्कालीन प्रमुख श्री. पंत सबनीस यांनीही ही मागणी पुढे रेटली होती.

१९८६: शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेत 'इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण व्हावे' अशी घोषणा केली. तेव्हापासून हा प्रश्न अधिक गंभीरपणे चर्चेत आला.

शिवसेना, शिव प्रतिष्ठान आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने आणि पाठपुरावा केला.

२०२१: तत्कालीन नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील नगरपालिकेच्या सभेत नामांतराचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

राजकीय पाठपुरावाः तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत लवकरच नामकरण करण्याची घोषणा केली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी सुमारे २५ ते ३० हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन शासनाला सादर केले होते. आमदार सदाभाऊ खोत यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला, ज्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला.

२०१४: शहरात नामकरण समिती स्थापन करून शिवप्रतिष्ठानचे बाळासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांच्यासह अनेकांनी हा पाठपुरावा चालू ठेवला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com