ISRO प्रमुख एस सोमनाथ यांना कर्करोग, आदित्य एल-1 च्या प्रक्षेपणाच्या दिवशीच झालं निदान

ISRO प्रमुख एस सोमनाथ यांना कर्करोग, आदित्य एल-1 च्या प्रक्षेपणाच्या दिवशीच झालं निदान

भारताच्या सूर्य मिशन आदित्य एल-1 च्या प्रक्षेपणाच्या दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना कर्करोग झाल्याचे निदान झालं होतं अशी माहिती समोर आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

भारताच्या सूर्य मिशन आदित्य एल-1 च्या प्रक्षेपणाच्या दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना कर्करोग झाल्याचे निदान झालं होतं अशी माहिती समोर आली आहे. सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान-3 मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या वेळी काही आरोग्याच्या समस्या होत्या. मात्र, त्यावेळी त्यांना याबाबत फारशी माहिती नव्हती. त्यांनी सांगितले की, ज्या दिवशी आदित्य-एल1 मिशन लाँच करण्यात आले त्याच दिवशी त्यांच्या शरीरात कर्करोग असल्याचे समजले.

पुढील उपचार घेण्यासाठी ते चेन्नईत गेले असून त्यांना हा आजार अनुवंशिकतेने झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यांचा आजार पूर्णपणे बरा व्हायला बराच वेळ लागेल. मात्र, हा लढा आपणच जिंकणार असल्याचा विश्वास सोमनाथ यांनी व्यक्त केला. अनेकदा स्कॅनिंग, बऱ्याच वैद्यकीय तपासण्या झाल्या असून सध्या माझं पूर्ण लक्ष, मी माझं काम आणि इस्रोच्या मिशन्सवर केंद्रीत केलं आहे. स्रोचे सर्व मिशन पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही सोमनाथ यांनी स्पष्ट केले.

त्यांनी सांगितले की ही बातमी केवळ त्यांच्यासाठीच नाही तर त्यांच्या कुटुंबासाठी आणि सहकाऱ्यांसाठीही मोठा धक्का होती. उल्लेखनीय म्हणजे, 2 सप्टेंबर 2023 रोजी, जेव्हा भारतातील पहिली अंतराळ-आधारित सौर वेधशाळा, आदित्य एल1, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी प्रवासाला निघाली, तेव्हा एस सोमनाथचे नियमित स्कॅन करण्यात आले ज्यामुळे त्याच्या पोटात कॅन्सरची वाढ झाल्याचे दिसून आले.

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराबद्दल आणि त्याच्या उपचारांबद्दलचा त्यांचा व्यावहारिक दृष्टीकोन, त्यांचे चारित्र्य आणि अतूट भावनेचे विलक्षण सामर्थ्य जगासमोर मांडणे, हे उल्लेखनीय. त्यातून बरे होणे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. केवळ चार दिवस हॉस्पीटलमध्ये घालवल्यानंतर, त्यांनी पाचव्या दिवसापासून कोणतीही वेदना न होता काम करत इस्त्रोमध्ये आपले कर्तव्य पुन्हा सुरु केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com