Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्ला अंतराळात झेप घेण्यासाठी सज्ज! AX-4 मोहीम आज प्रक्षेपीत होणार
आजचा दिवस भारताच्या अंतराळ मोहिमेत एक मोठा आणि ऐतिहासिक दिवस आहे. अखेर अनेक अडथळ्यांनंतर भारतीय वंशाचे इस्रोचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आज अंतराळात झेप घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. इस्रोची अॅक्सियम-4 मोहीम आज दुपारी लाँच होणार आहे. आज दुपारी 12 वाजून 1 मिनिटांनी याचं प्रक्षेपण होणार असून, यासाठी भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला इतिहास घडवण्यास सज्ज झाले आहेत.
यापुर्वी 6 वेळा अॅक्सियम-4चं प्रक्षेपण टळलेलं होत. या मोहिमेच्या प्रक्षेपणात 6 वेळा विलंब झाला असून, यामागे विविध तांत्रिक अडचणी, खराब हवामान आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील गळती यासारखी कारणं समोर आली होती. आज भारतीय अंतराळ क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा क्षण असणारे, कारण शुभांशू शुक्ला हे अशा खासगी मिशनमध्ये सहभागी होणारे काही मोजक्या भारतीयांपैकी एक आहेत.
ही मोहीम केवळ तंत्रज्ञानाचाच नव्हे, तर जागतिक पातळीवर भारताच्या अंतराळक्षेत्रातील सहभागाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणारे. भारतासह या मोहिमेत हंगेरी आणि पोलंडचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हे अभियान तिन्ही देशांसाठी ऐतिहासिक मानले जाते. हे अभियान भारतासाठी महत्त्वाचे आहे. कारण, बऱ्याच काळानंतर एक भारतीय अंतराळात जाणार आहे.