ताज्या बातम्या
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना घोटाळ्यात उपघोटाळा! पुरुषांनंतर 9 हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ
लाडकी बहीण योजनेत झालेले एक एक घोटाळे आता समोर येत आहेत. आता 9 हजार 526 राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ उचलल्याचे निदर्शनास आले आहे.
लाडकी बहीण योजनेत झालेले एक एक घोटाळे आता समोर येत आहेत. महिलांसाठी सुरु केलेल्या या योजने अंतर्गत दरमहा देण्यात येणारे 1500 रुपये पुरुषांच्या खात्यांत गेले असल्याचा धक्कादायक प्रकार लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असताना उघड झाला आहे. हे प्रकरण सुरु असतानाच आता 9 हजार 526 राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ उचलल्याचे निदर्शनास आले आहे.
धक्कादायक म्हणजे, राज्य सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या महिला कर्मचारी एकीकडे निवृत्तीवेतन घेत असताना ‘लाडकी बहीण’चे महिन्याकाठी 1500 रुपयेही त्यांच्या खात्यात जमा होत होते. कर्मचाऱ्यांबाबत छाननी करताना सेवार्थ प्रणालीचा आधार घेण्यात आला आणि त्यातून ही गडबड लक्षात आली.