Navi Mumbai : नवी मुंबई हादरली!
Navi Mumbai : नवी मुंबई हादरली! Navi Mumbai : नवी मुंबई हादरली!

Navi Mumbai : नवी मुंबई हादरली! केवळ पैशांसाठी आईने पोटच्या लेकीसाठी जे काही केलं...

नवी मुंबईतील कोपरा गावातील राहणारी नूरबी अन्सारी नावाच्या महिलेने आपल्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीला केवळ पैशांसाठी एका अनोळखी व्यक्ती सोबत पाठवल्याचे समोर आले आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • ७० वर्षीय व्यक्तीचे १० वर्षीय मुलीवर मद्य पाजून लैंगिक अत्याचार

  • कैदाशीन आईनीचे पैशांसाठी करून घेतले घृणास्पद कृत्य

  • तळोजा मधील धक्कादायक घटना उघडकीस...

Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील तळोजा फेज 2 मधील एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, अनेकांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. नवी मुंबईतील कोपरा गावातील राहणारी नूरबी अन्सारी नावाच्या महिलेने आपल्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीला केवळ पैशांसाठी एका अनोळखी व्यक्ती सोबत पाठवल्याचे समोर आले आहे.

घटनेतील आरोपी मूळ राहणार लंडन 70 वर्षीय फारुख शेख हा तळोजा फेज 2 मधील एकता डेव्हलपर्स सेक्टर 20 मधील रूम 30 प्लॉट 23 राहण्यास होता.त्याच्याकडे नवी मुंबई खारघर कोपरा गावातील नूरबी अन्सारी हिने तिच्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीला मागील दोन दिवस रात्री पाठविले.या बदल्यात तिने फारुख शेख कडून अडीच लाख आणि महिन्याचे घरातील रेशन भरून घेण्याचा सौदा केला.

याबाबत एका गुप्त माहिती द्वारे नवी मुंबईतील अनैतिक मानवी वाहतूक पथकाला माहिती मिळाली,पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे आणि त्यांच्या टीमने संबंधित ठिकाणी छापा मारला असता,मुलीला आणि आरोपी फारुख शेख याला ताब्यात घेतले असता,चौकशीत धोकादायक घटना समोर आली.पीडित 10 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईनीचे आरोपी कडून पैसे आणि रेशन घेऊन तिला त्याच्यासोबत पाठविले असल्याचे उघडकीस आले.

रोज रात्री स्वतः मुलीला घेऊन जाऊन सकाळी तिला आणायला जात असे आणि आरोपी मुलीला मद्य पाजून तिच्यावर रात्रभर लैंगिक अत्याचार करत असल्याचेही समोर आले आहे.दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कोर्टात हजर करून त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेने नवी मुंबई परिसरात संताप व्यक्त केला जात असून, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com