UBT Special Report : उद्धव ठाकरेंना धक्का? सांगलीतील बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे लोकसभा निवडणुकीपासून उद्धव ठाकरेंसोबत आहेत. लोकसभा निवडणुकीत ते ठाकरेंच्या पक्षाकडून निवडणुकींसाठी उभे होते. त्यानंतर ते कमी मतांनी पडले होते. त्यानंतर अनेकांना प्रश्न पडला की, चंद्रहार पाटलांच्या मनात नेमकं चाललंय काय? उद्योगमंत्री उदय सामंत आणि चंद्रहार पाटलांची जवळीक वाढता दिसत आहे. एका कार्यक्रमात उदय सामंत यांनी जाहीर सभेत पाटलांना खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. वाचूयात या बद्दलचा स्पेशल रिपोर्ट
कोण आहे चंद्रहार पाटील ?
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील. पैलवान म्हणून चंद्रहार पाटलांची ओळख आहेच. पण त्यांची दुसरी एक ओळख आहे ती म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे सांगलीचे बडे नेते आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेसची नाराजी डावलून ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं होतं. तिथं त्यांचा पराभव झाला. मात्र आता चंद्रहार पाटील पुन्हा नव्याने चर्चेत आलेत. ती चर्चा आहे चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांत चंद्रहार पाटील यांनी उदय सामंत यांची अनेकदा भेट घेतली. त्यावरून या चर्चांना उधाण आल आहे. आता तर या चर्चांना बळ मिळेल असं वक्तव्य खुद्द उदय सामंत यांनी जाहीर सभेत केल आहे.
चंद्रहार पाटील हे सांगलीसह महाराष्ट्रातील अनेक भागांत कुस्त्यांच्या भव्य स्पर्धा आयोजित करत असतात. महाराष्ट्रातील अनेक पैलवानांमध्ये चंद्रहार पाटलांना मानाचं स्थान आहे. अनेक सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सहभाग असतो आणि अनेक विषयांवर ते आंदोलनंही करत असतात. लोकसभा निवडणुकीपासून ते राजकीय मैदानात ठाकरेंच्या शिवसेनेकडून शड्डू ठोकता असतात. मात्र आता उदय सामंत यांच्या खुल्या ऑफरनंतर ते शिंदेंसोबत जाऊन ठाकरेंविरोधात दंड थोपटणार का? याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.