Chandrahar Patil : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! चंद्रहार पाटलांच ठरलं? शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला परत एकदा मोठा धक्का बसला आहे. चंद्रहार पाटील उद्या शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची शक्यता वर्तावली जात आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता ठाण्यातील नेहरू नगर परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे, खा. नरेश म्हस्के, खा.धैर्यशील माने, सांगलीतील स्थानिक आमदार सुहास बाबर, मंत्री उदय सामंत,मंत्री संजय शिरसाट, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्याचसोबत चंद्रहार पाटलांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील आमदारकीसंदर्भात सुद्धा चर्चा झाल्याच समोर आलं आहे. मंत्री उदय सामंत आणि स्थानिक आमदार सुहास बाबर यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं यावेळी समोर येत आहे. तर 5000 - 7000 कार्यकर्त्यांसह हा पक्षप्रवेश होणार आहे.