ITR Filing  : आज शेवटची तारीख, आजच  भरा Income Tax Return

ITR Filing : आज शेवटची तारीख, आजच भरा Income Tax Return

इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज शेवटची संधी आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज शेवटची संधी आहे. ही अंतिम मुदत वाढवली जाईल की नाही याबद्दल अद्याप प्रशासनाकडून कोणतीही देण्यात आलेली नाही आहे. जर तुम्ही पगारदार व्यावसायिक असाल आणि तुमचा पगार 50 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला ITR फॉर्म-1 भरावा लागेल.

आयकर रिटर्न भरताना करदात्यांनी आयकर विवरणात त्यांच्या उत्पन्नाची योग्य माहिती दिली पाहिजे. आयकर रिटर्नवर प्रक्रिया झाली असली तरी ते कलम 139(5) अंतर्गत ऑनलाइन रिव्हाइज रिटर्न भरू शकतात. आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे तुम्हाला काहीशा अडचणी येऊ शकतात.

ज्या करदात्यांनी अद्याप त्यांचा आयकर परतावा भरलेला नाही, ते आयकर (www.incometax.gov.in)- eportal.incometax.gov.in/ वर जाऊन आयटीआर दाखल करू शकतात. वर्ष 2023-24 साठी ITR दाखल करण्याची ही अंतिम मुदत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com