YSR
YSR

जगनमोहन रेड्डी असणार YSR काँग्रेसचे आजीवन अध्यक्ष; दोन दिवसीय बैठकीनंतर घोषणा

जगनमोहन रेड्डी यांच्या आई आता मुलीच्या YSR तेलंगणासाठी मैदानात उतरणार आहे.
Published by :
Sudhir Kakde

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची वाय. एस. आर काँग्रेस (Yuvajana Sramika Rythu Congress) पक्षाच्या कायमस्वरुपीचे पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. पक्षाच्या घटनेत दुरुस्ती केल्यानंतर YSRC च्या दोन दिवसीय बैठकीच्या समारोपाच्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला. पक्षाच्या संसदीय पक्षाचे नेते विजयसाई रेड्डी यांनी एक दिवस आधीच सांगितलं होतं की, जगन मोहन रेड्डी यांना YSRCP चे आजीवन अध्यक्ष केलं जाईल. वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या आई वायएस विजयम्मा यांनी शुक्रवारी सांगितल होतं की, तेलंगणात त्यांची मुलगी वायएस शर्मिला यांना मदत करण्यासाठी वायएसआरच्या मानद अध्यक्षपदाच्या भूमिकेपासून दूर जाण्याचा विचार करत आहे.

YSR
...म्हणून या भेटीगाठी सुरु; शिंदेंनी सांगितलं दिल्ली दौऱ्याचं गुपीत

शर्मिला यांनी गेल्या वर्षी राज्यातील विधानसभा निवडणुका लढवण्याच्या उद्देशाने YSR तेलंगणा पक्ष स्थापन केला होता. विजयसाई रेड्डी म्हणाले की, सध्या तेलंगणात शर्मिला यांना पाठिंब्याची आवश्यकता आहे. "यावेळी तेलंगणात वायएस शर्मिला यांना पाठिंबा आवश्यक असून, आमच्या पक्षाचे विद्यमान अध्यक्ष वायएस जगन मोहन रेड्डी यांना वायएसआर काँग्रेसचे आजीवन अध्यक्ष बनवले जाईल. असा प्रस्ताव या सभेत मांडला होता."

जगन मोहन रेड्डी यांनी मार्च 2011 मध्ये काँग्रेसशी संबंध तोडल्यानंतर वाय. एस. आर. काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर जगन मोहन यांनी पक्षाचं अध्यक्षपद भुषवलं, तर त्यांची आई विजयम्मा मानद अध्यक्ष आहेत. विजयम्मा यांनी शुक्रवारी सांगितलं की, जगन मोहन रेड्डी संकटात असताना मी त्याच्यासोबत होते, आता माझ्या मुलीला माझी गरज असल्यानं मी तिच्यासोबत असलं पाहिजे.

"मी वाय. एस. आर काँग्रेसचे जबाबदारी सोडू इच्छित आहे. कारण तिकडे शर्मिला एकटीच लढतेय. राजशेखर रेड्डी यांची पत्नी आणि शर्मिलाची आई या नात्याने मला तिच्या पाठीशी उभं राहावं लागेल, असं माझं मन मला सांगतंय." असं विजयम्मा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सभागृहात सांगितलं होतं.

"जेव्हा त्या जगन मोहन रेड्डी अडचणीत होते, तेव्हा मी त्याच्यासोबत होतो, आता तो इथे आनंदी आहे. माझी मुलगी वायएस शर्मिला एकटी लढतेय. जर मी तिला साथ दिली नाही तर तो अन्याय होईल. त्यामुळे मी हा निर्णय घेतला असून, सर्वांना विनंती करतो की मला माफ करा, ”असं ती पुढे म्हणाली. 2023 मध्ये तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी विजयम्मा तेलंगणात जाणार आहे. विजयम्मा यांच्या वक्तव्यावरून असं लक्षात येतंय की, शर्मिला यांना विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com