जगन्नाथ मंदिर हे भारत देशाच्या ओडिशा राज्यातील पुरी शहरामधील एक हिंदू मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. जगन्नाथ रथयात्रा ही एक प्रसिद्ध वार्षिक यात्रा आहे. जी भगवान जगन्नाथ (कृष्ण) , त्यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत पुरी, ओडिशा येथे काढली जाते.
जगन्नाथ मंदिर हे भारत देशाच्या ओडिशा राज्यातील पुरी शहरामधील एक हिंदू मंदिर आहे. मंदिरामध्ये श्री जगन्नाथ (कृष्ण), श्रीबलभद्र (बलराम), देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. जगन्नाथ देव हा विष्णूचा एक अवतार मानला जातो.
जगन्नाथ रथयात्रा ही एक प्रसिद्ध वार्षिक यात्रा आहे. जी भगवान जगन्नाथ (कृष्ण), त्यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत पुरी, ओडिशा येथे काढली जाते. ही यात्रा आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते आणि गुंडिचा मंदिरापर्यंत तीन भव्य रथांमध्ये देवाची मिरवणूक निघते.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष द्वितीयाला सुरु होते. यंदा 27 जूनपासून यात्रेस सुरुवात होत आहे. भगवान जगन्नाथ यांच्या या यात्रेला ऐतिहासिक अन् पौराणिक महत्व आहे.
एकूण नऊ दिवस चालणारा हा उत्सव असतो. आस्था, श्रद्धा आणि भक्तीचा हा पुण्यपर्व आहे. या उत्सवात भगवान आपल्या भक्तांबरोबर असतात.
भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा देशात नाही तर विदेशातही प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो भविक या यात्रेसाठी जगन्नात पुरीत दाखल होत असतात.
महाप्रभू रथयात्रेच्या शुभप्रसंगी सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनी ओडिशातील पुरी बीचवर महाप्रभू जगन्नाथाच्या 101 मूर्तींसह वाळू कलाकृती तयार केली.