Admin
बातम्या
आमदार नितीन देशमुख यांची जल संघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली
आमदार नितीन देशमुख यांची जल संघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आमदार नितीन देशमुख यांची जल संघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जोपर्यंत पाणीप्रश्न सुटत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहणार असल्याचे देशमुख म्हणाले. अकोला ते नागपूर त्यांनी पायीं पदयात्रा काढली होती. ते आज नागपूर मध्ये दाखल होणार होते. त्या आधी त्यांना नागपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. ही यात्रा काढण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेतली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
बाळापूर व अकाेला तालुक्यातील खारपाणपट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या 69 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेला सरकारने स्थगिती दिल्याच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली.