Jalgaon : आज जळगाव जिल्हा बंदची हाक

Jalgaon : आज जळगाव जिल्हा बंदची हाक

आज जळगाव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज जळगाव जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. बांगलादेशात हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ही जळगाव बंदची हाक देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. बांगलादेशात सुरू असलेल्या दंगलीमध्ये अल्पसंख्यांक व हिंदू समाजावरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात आज जळगाव जिल्हा बंद राहणार आहे.

या जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत असून या जिल्हा बंदीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्केट बंद आहे.

बांगलादेशाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे बंदची घोषणा देण्यात आली आहे. जळगाव बंदीच्या घोषणेला शंभर टक्के प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com