जळगाव शहरातील मेहरून परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट

जळगाव शहरातील मेहरून परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट

जळगाव शहरात मेहरून परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले असून गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मंगेश जोशी, जळगाव

जळगाव शहरात मेहरून परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले असून गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मेहरून परिसरातील एक गाव एक गणपती व जय श्रीराम मित्र मंडळाची मिरवणूक जात असताना अज्ञातांनी महापौर जयश्री महाजन यांच्या घरासमोर गुलालाची उधळण करून महापौरांच्या घरावर दगडफेक करत वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून या घटनेमुळे दोन गट समोरासमोर आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. सदर घटनेनंतर विसर्जन मिरवणुकीतील गणपतीची मूर्ती घटनास्थळी सोडून अज्ञातांनी घटनास्थळावरून पळ काढला.

या संपूर्ण प्रकारानंतर पोलीस प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने रात्री उशिरा गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले असून याप्रकरणी महापौर जयश्री महाजन यांनी मेहरून परिसर हा संवेदनशील परिसर असून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त का नव्हता ? असा सवाल उपस्थित पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढत हल्लाबोल केला आहे. तसेच या प्रकाराची पोलीस प्रशासनाने सखल चौकशी करावी अशी मागणी ही महापौर जयश्री महाजन यांनी केली आहे.

Lokshahi
www.lokshahi.com