Jalgaon Train Accident: जळगावमध्ये मोठी दुर्घटना! रेल्वेमध्ये धूर पाहून प्रवाश्यांनी उड्या मारल्या,

Jalgaon Train Accident: जळगावमध्ये मोठी दुर्घटना! रेल्वेमध्ये धूर पाहून प्रवाश्यांनी उड्या मारल्या,

जळगावमध्ये पुष्पक एक्सप्रेसमध्ये ब्रेक दाबल्यामुळे धुर, प्रवाशांनी घाबरून उड्या मारल्या.
Published by :
Prachi Nate
Published on

जळगाव जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकातून ब्रेक दाबल्यामुळे धुर आला. मात्र, हा धुर एक्सप्रेसमधून येत आहे अशी आगीची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरुन रुळांवर उड्या मारल्या. पुष्पक एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी एक्सप्रेसमधून उड्या मारल्या. ज्यामध्ये समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं आहे. ज्यामध्ये अनेक प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com