आलिया गावात अजबं वरात; आयकर विभागाने लढवली भन्नाट शक्कल

आलिया गावात अजबं वरात; आयकर विभागाने लढवली भन्नाट शक्कल

जालन्यात 3 ऑगस्ट रोजी दिवसांपूर्वी आयकर विभागाने टाकलेल्या छापेमारीत 58 कोटींची रोख रक्कम, 32 किलो सोनं अशी एकूण 390 कोटींची बहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागली आहे.आयकर विभागाच्या 300 अधिकाऱ्यांनी जालन्यातील स्टील उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांच्या मालमत्तेवर 5 दिवसांपूर्वी छापेमारी केली होती.

जालन्यात 3 ऑगस्ट रोजी दिवसांपूर्वी आयकर विभागाने टाकलेल्या छापेमारीत 58 कोटींची रोख रक्कम, 32 किलो सोनं अशी एकूण 390 कोटींची बहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागली आहे.आयकर विभागाच्या 300 अधिकाऱ्यांनी जालन्यातील स्टील उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांच्या मालमत्तेवर 5 दिवसांपूर्वी छापेमारी केली होती.या छापेमारी दरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यानी स्टील उद्योजकांच्या कंपन्यांसह घरावर छापे टाकले होते.या छापेमारीतच काही दस्तावेज,32 किलो सोनं,58 कोटी रुपयांची रोख रक्कम अशी एकूण 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागल्यानं खळबळ उडाली आहे.

सध्या देशभरात ईडी आणि आयकर विभागाचे धाडसत्र सुरू आहे.गुन्हेगाराला आपला सुगावा लागू नये यासाठी असे छापे मारले जातात. यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जातात. जालना शहरात आयकर विभागाने मारलेला छापाही असाच होता. आयकर विभागाची ही वाहने कोणीही ओळखू शकले नाही. आयकर विभागाने एक भन्नाट कल्पना लढवली आहे. एमआयडीसी येथील काही रोलिंग मिलवर आयकर विभागाने आज छापेमारी केली. यामध्ये जिंदाल मार्केट परिसरातील एक कार्यालय सील करण्यात आले आहे.

आयकर अधिकाऱ्यांचे एक पथक स्थानिक पोलिसांच्या फौजफाट्यासह मामा चौकातील सुंदरलाल सावजी को ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेत दाखल झाले आहे. या बँकेतील दस्तावेज झडाझडती सुरू आहे. मात्र, आयकर विभागाचे अधिकारी कार्यालयात छापामारेपर्यंत त्यांना कोणीही ओळखले नाही. कारण, या वाहनांवर वधु-वराच्या विवाहाचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यामुळे महागड्या गाड्या असूनही कोणाच्याही नजरेत ही गोष्ट आली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com