ताज्या बातम्या
जालन्यातील लाठीचार्ज घटनेचे राज्यभरात पडसाद; राज्यात आज अनेक ठिकाणी बंद
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यभरातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे. यावरूनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
याच पार्श्वभूमीवर आज राज्यात अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. आज संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये बंदची हाक देण्य़ात आली आहे. जालना, नांदेड, हिंगोली, सातारा, बारामती, सांगली, सोलापूर आणि अमरावतीमधल्या दर्यापूरमध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. व्यापारी आणि दुकानदारांनी बंदला प्रतिसाद देण्याचं आवाहन मराठा आंदोलकांनी केली आहे.