MLA Arjun Khotkar : बायको असावी तर अशी! नवरा आमदार व्हावा म्हणून बायकोचा तिरुपतीला नवस

MLA Arjun Khotkar : बायको असावी तर अशी! नवरा आमदार व्हावा म्हणून बायकोचा तिरुपतीला नवस

अर्जुन खोतकर: पत्नीचा तिरुपतीला नवस, नवऱ्याचा विजय साजरा
Published by :
Riddhi Vanne
Published on

राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहे. यामध्ये महायुती सरकारला भरघोस मतदानी यश मिळाले होते. त्याचे मुख्य कारण होतं ते म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेदरम्यान राज्यातील माहिलांना दरमहिना 1500 रुपये राज्यसरकारने जाहीर केले होते. त्यानंतर महायुतीने राज्यात सरकार स्थापना झाले. मराठवाड्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी यांच्यामध्ये चुरशीची लढत होती.

जालन्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याला लढत होती. या लढाईमध्ये अर्जून खोतकर हे भरघोस मतदांनी निवडुण आले. आपला पती पुन्हा एकदा आमदार व्हावा, यासाठी तरुपती बालाजीला नवस बोलल्या होत्या. मनातील इच्छा पुर्ण होण्यासाठी देवाकडे नवस बोलला जातो. त्यांनतर मनातील इच्छा पुर्ण झाली, तो नवस फेडायचा असतो.

अर्जुन खोतकर यांची पत्नी सीमा खोतकर यांनी आपल्या नवऱ्यासाठी केलेला नवस फेडण्यासाठी तिरुपती बालाजीकडे जाऊन त्यांनी त्यांचे केस दान केले. पत्नीने आपला नवस पूर्ण केल्यानंतर आमदार अर्जुन खोतकर यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अर्जुन खोतकर आणि सीमा खोतकर या दिसत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com