Terrorist Killed : 6 दहशतवाद्यांचा खात्मा ; सुरक्षा दलाची कारवाई
जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी नरपराध्य हिंदू पर्यटकांवर हल्ला केला. यामध्ये सुमारे 26 नागरिकांचा हाकनाक जीव गेला. या सगळ्याचा बदला म्हणून भारतीय सुरक्षा दलाने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. यामध्ये भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. दरम्यान गुरुवारी झालेल्या पुलवामामधील चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
सुरक्षा दलाच्या जवानांनी त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्याशी या दहशतवाद्यांचा संबंध आहे की नाही? याबद्दल चौकशी केली जात आहे. मारले गेलेले हे तीन दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते. त्रालमधील चकमकीत आसिफ अहमद शेख, आमिर नझीर वाणी आणि यावर अहमद भट या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
सुरक्षा दलाच्या जवानांनी तिघांचा खात्मा केला. त्यानंतर एकाची ओळख उघड झाली आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की पुलवामा येथील त्राल चकमकीत मारला गेलेला दहशतवादी आसिफ शेख आहे. तो जैश-ए-मोहम्मदचा कमांडर होता.
गेल्या 48 तासांत सुरक्षा दलांनी अशा प्रकारे 6 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. दोन दिवसांपूर्वी शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारले होते. 13 मे रोजी शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे 3 दहशतवादी मारले गेले.