Janmashtami 2023:  देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होणार 'श्रीकृष्ण जन्माष्टमी'

Janmashtami 2023: देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होणार 'श्रीकृष्ण जन्माष्टमी'

आज मध्यरात्री 12 च्या सुमारास श्रीकृष्णाचा जन्म होईल.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज मध्यरात्री 12 च्या सुमारास श्रीकृष्णाचा जन्म होईल. आज देशभरात मोठ्या थाटामाटात श्रीकृष्णजन्माष्टमी' साजरी करण्यात येणार आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. जन्माष्टमीच्या दिवशी घरोघरी श्रीकृष्णाच्या बालस्वरुपाची पूजा केली जाते. उपवास ठेवला जातो.

श्रीकृष्ण जन्माष्टमीचे रोहिणी नक्षत्र 6 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 09.20 पासून सुरू होईल. तो दुसऱ्या दिवशी 07 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10:25 वाजता संपेल.भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.

श्रीकृष्ण जन्माष्टमी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात येते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे.गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. गुजराथमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात आणि रात्री बारा वाजता कृष्णजन्माचा उत्सव साजरा करतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com