Japan's cherry blossoms are now in Mumbai... Know where and how to go...
Japan's cherry blossoms are now in Mumbai... Know where and how to go...

Japan Like Cherry Blossom Place In Mumbai : जपानच्या चेरी ब्लॉसम आता मुंबईत... कुठे आणि कसं जाण्याचं जाणून घ्या...

जपान म्हटलं की अनेकांच्या मनात फुलांनी नटलेले गुलाबी रस्ते उभे राहतात. वसंत ऋतूमध्ये हे दृश्य पाहण्यासाठी जगभरातून लोक जपानला जातात.
Published by :
Riddhi Vanne

जपान म्हटलं की अनेकांच्या मनात फुलांनी नटलेले गुलाबी रस्ते उभे राहतात. वसंत ऋतूमध्ये हे दृश्य पाहण्यासाठी जगभरातून लोक जपानला जातात. पण अशीच गुलाबी अनुभूती घेण्यासाठी मुंबईकरांना आता परदेशात जाण्याची गरज नाही. मुंबईतच काही दिवसांसाठी निसर्ग गुलाबी रंगांची उधळण करतो आणि तो अनुभव अगदी जवळून पाहता येतो.

1. मुंबईतला गुलाबी चमत्कार

जपानच्या चेरी ब्लॉसमसाठी परदेशात जाण्याची गरज नाही. मुंबईतच काही दिवसांसाठी गुलाबी रंगांची जादू अनुभवता येते.

2. विक्रोळी–घाटकोपरचा बदललेला चेहरा

ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील विक्रोळी ते घाटकोपर दरम्यानचा रस्ता सध्या गुलाबी फुलांनी सजला आहे. शहराच्या गडबडीत हा भाग अगदी वेगळाच भासतो.

3. ही फुलं कोणती आहेत?

ही जपानी साकुरा नसून ‘पिंक टॅबेबिया’ नावाची झाडं आहेत. पण फुलांचा बहर पाहिला की क्षणभर जपानची आठवण होते.

4. काही आठवड्यांसाठीच हा नजारा

फेब्रुवारी-मार्चमध्ये झाडांवर गुलाबी फुलांची गर्दी दिसते. रस्त्यावर साचलेली फुलं संपूर्ण परिसर सुंदर करून टाकतात.

5. सोशल मीडियावर व्हायरल

ड्रोन शॉट्स, रील्स आणि फोटोमुळे हा परिसर सध्या प्रचंड चर्चेत आहे. अनेक मुंबईकर खास फोटो काढायला इथे येत आहेत.

6. कसं जायचं?

विक्रोळी किंवा घाटकोपर स्टेशन

ऑटो/कारने ईस्टर्न एक्सप्रेस हायवे

कोणतंही तिकीट नाही – हा सार्वजनिक रस्ता आहे.

7. थोडं भान ठेवा

फुलं तोडू नका, झाडांना इजा करू नका आणि रस्ता अडवू नका. निसर्ग सुंदर ठेवणं आपली जबाबदारी आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com