Japan PM Sanae Takaichi : जपानच्या संसदेत नवा अध्याय! सनाई तकाइची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान
जपानच्या संसदेने ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे. जपानच्या राजकारणात पहिल्यांदा अशी गोष्ट घडली आहे, ज्यामुळे जपानचे राजकारण चर्चेत आलं आहे. मागील काही महिन्यांपासून जपानमध्ये पंतप्रधानपदाबाबत उत्सुकता सुरू होती, जी अखेर संपली आहे. जपानच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पंतप्रधान मिळाल्या आहेत. जपानच्या पार्लमेंटने अतिपुराणमतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सनाई तकाइची यांची जपानच्या पहिल्या वहिल्या पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे.
जपानमध्ये जुलै महिन्यात उदारमतवादी लोकशाही पक्षाचा पराभव झाल्यानंतर राजकीय पोकळी निर्माण झाली होती. त्यामुळे तेव्हापासून देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने पंतप्रधान कोण होणार, याबाबत प्रचंड उत्सुकता होती. इशिबा यांनी त्यांच्या मंत्रिमंडळासह राजीनामा दिल्यानंतर तकाइची यांना सरकारस्थापनेचा मार्ग मोकळा करून दिला. इशिबा केवळ एक वर्ष पंतप्रधान म्हणून होते. तकाइची यांच्या निवडीमुळे प्रशासनावर येत्या काळात उजव्या विचारसरणीचा अधिक प्रभाव राहण्याची शक्यता आहे.
सनाई ताकाई यांना अति रुढीवादी नेत्या म्हणून ओळखले जाते. त्यांनी वयाच्या 64 वर्षी राजकारणात पाऊल ठेवले. 1993 मध्ये त्या सर्वात प्रथम संसदेत निवडून आल्या होत्या. त्यांनी आर्थिक सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा आणि लैंगिक समानता यांसह विविध मुद्द्यांवर काम केले आहे. यादरम्यान पक्ष आणि सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

