पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी, जयंत पाटील

पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी, जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

23 नोव्हेंबर 2019 रोजी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र हे सरकार फारकाळ टिकू शकले नाही. मात्र हा पहाटेचा शपथविधी देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केलं आहे.

एका माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते," असे जयंत पाटील म्हणाले.

तसेच राष्ट्रवादी फुटली नाही. शिवसेनेचेच आमदार गेले म्हणून सरकार कोसळलं. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली हे आपल्याला नाकारता येणार नाही." असे जयंत पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com