विरोधी पक्षात आहोत, काही गोष्टी सोसाव्या लागणारच - जयंत पाटील
Admin

विरोधी पक्षात आहोत, काही गोष्टी सोसाव्या लागणारच - जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना काही दिवसापूर्वी ईडीची नोटीस आली होती.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना काही दिवसापूर्वी ईडीची नोटीस आली होती. आयएल आणि एफएस (ILFS) प्रकरणात त्यांना ईडीची नोटीस आली आहे. याला उत्तर देण्यासाठी जयंत पाटील ईडी कार्यालयात दाखल झाले. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून मुंबईत कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली असून जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ मोठे आंदोलन करणार आहेत. यावर जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन कार्यकर्त्यांना कोणीही मुंबईला येऊ नये, अशी विनंती केली आहे.

ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सर्वांनी शांतता राखा. मला जे काही विचारलं जाईल त्याची उत्तरं दिली जाणार आहेत. चिंतेचं काही कारण नाही. आपण विरोधी पक्षात आहोत. काही गोष्टी सोसाव्या लागणारच ना. सर्व कसं सहसासहजी होईल? असे जयंत पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com