Jayant Patil : "सरकारने आखलेल्या चुकीच्या धोरणांचे ओझे सामान्य माणसाला हाकावं लागतंय"
पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यानंतर आता घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. 8 एप्रिल 2025 पासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात येत आहे. घरगुती गॅस सिलेंडर महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले की, “आज सकाळीच शेअर मार्केट गडगडले आणि सामान्य मध्यमवर्गीय माणसाला त्याचा धक्का बसला. या धक्क्यातून सावरत नाही तोच आज केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर २ रुपये एक्साईज ड्युटी वाढवली आहे.”
"त्यामुळे पेट्रोल डिझेलही महाग होणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली आहे. उद्यापासून नवीन किमती लागू होणार आहे. सरकारने आखलेल्या चुकीच्या धोरणांचे ओझे सामान्य माणसाला हाकावी लागत आहे. त्यात सामान्य माणसाचे कंबरडे मोडले जात आहे."