पंतप्रधान मोदी यांच्या सभेत झालेल्या गोंधळावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत झालेल्या गोंधळावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या दिंडोरीमध्ये प्रचार सभा पार पडली.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या दिंडोरीमध्ये प्रचार सभा पार पडली. या सभेच्यावेळी पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु असताना एका तरुणाने कांद्यावर बोला अशी घोषणाबाजी केली. त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सभास्थळावरुन बाहेर नेलं. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

यावर आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले की, कांद्याचा प्रश्न तीन-चार जिल्ह्यात फार महत्त्वाचा आहे. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन हा प्रश्न मांडायचा काम केलं. त्याला उत्तर काय तर जय श्री राम.

त्यामुळे महाराष्ट्राला कळलं की शेतकऱ्यांचे प्रश्नाकडे बघण्याची यांची प्रवृत्ती काय आहे. यांना कशाचंच उत्तर देता नाही आलं की जय श्री राम शिवाय दुसरं काही सुचत नाही. त्यांने जी भूमिका घेतली ती शेतकऱ्यांच्यावतीने घेतली. त्याचे धाडस आहे, त्याचे कौतुक आहे.असे जयंत पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com