Jitendra Awhad On Ramgiri Maharaj: रामगिरी महाराजला जोड्याने मारायची वेळ; आव्हाड यांचा हल्लाबोल
अहिल्यानगर शहरातील ईसळक निंबळक या गावांमध्ये निसर्गसृष्टी गोशाळेच्या मुक्त गोठ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आलेल्या महंत रामगिरी महाराजांचे जोरदार स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची सुरुवात ही वंदे मातरम ने करण्यात आली. कालच महंत रामगिरी महाराजांनी राष्ट्रगीत "जन गण मन" वरून केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले होते.
आपल्या देशाचे राष्ट्रगीत हे "वंदे मातरम" असावे असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं त्यातच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात "वंदे मातरम" ने केल्याने पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे रामगिरी महाराज यांच्या विधानावर पुन्हा एकदा पडसाद उमटताना दिसत आहेत. यादरम्यान रामगिरी महाराज म्हणाले की, माझी मागणी अशी आहे की, राष्ट्रगीत असं असाव की त्यातून देशाचं समाजप्रबोधन व्हाव... देशाला उद्देशुन असाव हा माझा उद्देश आहे.
आता रामगिरी बाबाचं अती होत चाललं आहे- जितेंद्र आव्हाड
याचपार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड रामगिरी महाराज यांच्या विधानावर संतप्त होत म्हणाले की, आता रामगिरी महाराजला जोड्याने मारायची वेळ आली आहे. आता "जन गण मन" वर पण त्याचा आक्षेप आहे? असा प्रश्न आव्हाडांनी माध्यमांसमोर बोलताना केला आहे... त्याला म्हणावं त्याच्यापेक्षा बॅनची मागणी कर ना, आता रामगिरी बाबाचं अती होत चाललं आहे असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केल आहे.