Jitendra Awhad : 'चंद्रकांत पाटील साहेब आता इथून पुढे विचारू नका Who Is Dhangekar?'
पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर म्हणाले की, "कोणताही निर्णय घ्यायचा प्रचंड कठीण असतो. कारण ज्या पक्षामध्ये गेले 10- 12 वर्ष काम करतोय. सर्वांनीच आपल्यावर प्रचंड प्रेम केलं आहे. एखादा पक्ष सोडताना मनात दु:ख होतं. कार्यकर्तेपण बऱ्याच दिवसापासून ऐकत नव्हते. मतदारांशीपण चर्चा केली की, त्यांचे म्हणणे होते की, आता आमचे काम कोण करणार?"
"लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय देऊ शकत नाही. मागच्यावेळी 2-3वेळा मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कामानिमित्त भेटलो. आमचे मित्र उदय सामंत यांच्याशी पण मी बोलत होतो. ते वारंवार म्हणाले एकदा तुम्ही आमच्याबरोबर काम करा. ज्यांचा चेहरा सर्वसामान्यामध्ये पोहचलेला आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला काही हरकत नाही अशी मनाची मानसिकता झाली. आज मी निर्णय घेतलेला आहे की, आपण शिंदे साहेबांबरोबर काम करावं. आज शिंदे साहेबांची आणि माझी संध्याकाळी 7 वाजता भेट होईल. जो काही निर्णय होईल तो संध्याकाळी होईल. मी काँग्रेस पक्षाचे मनापासून आभार मानले आहेत. काँग्रेस पक्षाने मला प्रेम दिलंय. माझी काँग्रेस पक्षावर कधीही नाराजी नाही. मला त्यांनी भरपूर दिलं आहे."
याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "चंद्रकांत पाटील साहेब आता इथून पुढे विचारू नका Who Is Dhangekar? कारण आता ते तुमचे सखे सोयरे झालेत बरं का." असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.