‘औरंगजेबजीच्या कबरीवर फुले वाहताना बावनकुळेजी’; चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘तो’ फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट

‘औरंगजेबजीच्या कबरीवर फुले वाहताना बावनकुळेजी’; चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘तो’ फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रुर नसल्याचे म्हंटले होते.
Published by :
Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रुर नसल्याचे म्हंटले होते. यावर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेच वादात सापडले आहे. बावनकुळे यांनी औरंगजेबाचा आदरार्थी उल्लेख केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

आव्हाडांच्या विधानाचा निषेध करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड स्टंटबाज माणूस आहे, नौटंकी आहे. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात नौटंकी असते. ते औरंगजेबजी यांना क्रूर मानत नाहीत. परंतु, यावेळी त्यांनी हिंदीत उच्चार करताना औरंगजेबचा उल्लेख ‘औरंगजेबजी’असा केला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक फोटो ट्वीट करून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत असे लिहिले आहे की, ‘औरंगजेबजीच्या कबरीवर फुले वाहताना बावनकुळेजी’ अशा शब्दात त्यांनी खोचक ट्विट केलं आहे. या फोटोमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दिसत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com