ताज्या बातम्या
Fake Marksheet : बारावीची बनावट गुणपत्रिका; महिलेनं मिळवली अंगणवाडी सेविकेची नोकरी
बनावट गुणपत्रिकेच्या आधारे महिलेनं अंगणवाडी सेविकेची नोकरी मिळवल्याची धक्कादायक माहिती समोर आला आहे.
बनावट गुणपत्रिकेच्या आधारे महिलेनं अंगणवाडी सेविकेची नोकरी मिळवल्याची धक्कादायक माहिती समोर आला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील निलज येथे हा प्रकार घडला आहे. बारावीची बनावट गुणपत्रिका तयार करून या महिलेनं नोकरी मिळवली. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशीनंतर कारवाई करण्यात आली, असं संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितलं. तक्रारदार स्नेहा तितरमारे यांनी सांगितले की, मला असं सतत आढळून येतंय की या कागदपत्रांमध्ये घोटाळा झाला आहे. या कागदपत्रांची पडताळणी करून मला न्याय द्यावा. ज्या व्यक्तीने खोटी कागदपत्र जोडली आहेत, तिच्यावर कारवाई करावी. तसेच संबंधीत अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागमी तक्रारदार महिलेनं केली आहे.