Jos Buttler IPL Record
Jos Buttler IPL Record

जॉस बनला IPL चा बॉस! 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज, कोहलीला मागे टाकून रचला इतिहास

आयपीएलच्या ३१ व्या सामन्यात जॉस बटलरने धडाकेबाज फलंदाजी करुन शतकी खेळी केली. बटलरने मैदानात धावांचा पाऊस पाडून कोलकाता नाईट रायडर्सविरोधात राजस्थानला विजय मिळवून दिला.
Published by :

आयपीएलच्या ३१ व्या सामन्यात जॉस बटलरने धडाकेबाज फलंदाजी करुन शतकी खेळी केली. बटलरने मैदानात धावांचा पाऊस पाडून कोलकाता नाईट रायडर्सविरोधात राजस्थानला विजय मिळवून दिला. राजस्थान पराभवाच्या छायेत असतानाही बटलरने धावांचा पाऊस पाडला आणि राजस्थान २ विकेट्सने जिंकला. या सामन्यात बटलरने ६० चेंडूत १०७ धावांची खेळी केली. त्याच्या इनिंगमध्ये बटलरने ९ चौकार आणि ६ षटकार ठोकले. बटलरच्या खेळीमुळं पुन्हा एकदा सिद्ध झालं की, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे.

बटलरचा आयपीएलमधील हा सातवा शतक आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त शतक ठोकण्याच्या यादीत कोहलीनंतर बटलर दुसऱ्या स्थानावर आहे. परंतु, आयपीएलमध्ये लक्ष्य गाठताना बटलरने हे तिसरं शतक ठोकलं. तर विराटने आतापर्यंत दोन शतकच ठोकले आहेत. त्यामुळे या फॉर्मेटमध्ये बटलरने कोहलीला मागं टाकलं आहे.

बटलरचा टी-२० करिअरमधील हा आठवा शतक आहे. इंग्लंडकडून टी-२० मध्ये सर्वात जास्त शतक ठोकण्यारा फलंदाज म्हणून बटलरच्या नावाची नोंद झालीय. १२१ धावांवर राजस्थानने ६ विकेट गमावले होते. त्यानंतर टीमने १०३ धावा करून विजय संपादन केलं. शेवटच्या पाच षटकांत राजस्थानला विजयासाठी ९६ धावांची आवश्यकता होती. बटलरच्या शतकी खेळीमुळे राजस्थानला विजयाला गवसणी घालता आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com